Friday, January 3, 2014

आनंद भुवनाचा बोर्ड : सावंतवाडी 

निळा ऑईल पेंट लावलेल्या लाकडी फळ्यांवर , लाकडातच कोरून वरून बसवलेली चंदेरी अक्षरं .

असा अ आता कुठे बघायला मिळतो ?

न चा दांडा नि त्याची गाठ यांचे  प्रमाणबद्ध नातेसंबंध .
साधारणपणे अशा प्रकारच्या देवनागरी वळणाचे अनुस्वार diamond shape चे असतात, इथे तो सरळ वापरलाय. 
आणि इतर अक्षरांच्या मानानं तो थोडा लहान चणीचा असल्यानं गंमत वाढली.
मोठ्या माणसांच्या रांगेत एखाद्याच्या कडेवर छोटं मूल असावं तसं .

भ ची वरची गाठ मोडून मजा केलेली आणि खालची गाठ न च्या गोल गाठी पेक्षा वेगळी , त्रिकोणी ! धमाल.
शीर्षरेघ आणि न ची आडवी रेघ यातल्या अंतरानं मोकळ्या जागेचं (negative space ) महत्त्व अधोरेखित होतं.

लडिवाळ उकार.

व चा मोहक वाकडेपणा .
मधला , oval shape मध्ये बसवलेला श्रीकृष्ण आपल्याला राजा रवि वर्म्याच्या काळात घेऊन जातो . 

हे सगळं असूनही आणखी काही निरागस गोष्टी या अक्षरांत आहेत नि त्या आपल्या ह्या मराठीच काय जगातल्या कोणत्याच भाषेत सांगता येतील असं वाटत नाही. 

इथला उसळ-पाव जगात भारी. 

ह्या वर्षात येईल पुस्तक. 


1 comment:

Akshay said...

सर माझा जन्म सावंतवाडीतला या आनंद भुवन मधली भाजी पाव आणि भजी खाऊन कॉलेजचे दिवस घालवले... पण एवढ्या वर्षात कधी या बोर्डातली कलात्मकता दिसली नाही. ती तुम्ही दाखवलात. थ्यांक्यू.. ही पोस्ट फेस बुक वर आहे का? मला शेअर करायची आहे. आणि खर सांगू.. या बोर्डच्या जुनाट पणावर जोक्सच केलेत आम्ही मित्रांनी...